मुंबई / प्रतिनिधी
आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहरुख खानने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, सातासमुद्रा पार देखील आहे. कायम अभिनेत्याची कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चा होत असते. पण आता अभिनेता कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे.

रिपोर्टनुसार, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी रायपूर कोर्टाने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला नोटीस बजावली आहे. याबाबत एका तरुणाने तक्रार दाखल केली आहे. आपल्या अभिनयाने सगळ्यांना वेड लावणारा शाहरुख खान अनेक ब्रँड्सचा ॲम्बेसेडरहीआहे. त्याने क्रीम्ससह अनेक लोकप्रिय जाहिरातीही केल्या आहेत.
Leave a Reply