आझाद चौकातील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग, लाखाेंचे नुकसान

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर आझाद चौक येथील फर्निचरच्या दुकाना भीषण आग लागली. ही घटना दि. २० मार्च रोजी सकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान घडली. या अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ उडाला. मात्र रमजान असल्याने मुस्लीम बांधव सकाळी जागी असल्याने मोठा अनर्थ टळला.

आझाद चौकात अनेक छोटेेी मोठी फर्निचरची दुकाने आहेत. हा चौक नेहमी वर्दळीचा आणि गर्दीचे ठिकण आहे. आग सकाळी पहाटच्या वेळी लागल्याने त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षास व आम्हास कळविले तात्काळ पोलीस बंदोबस्त हजर झाला फायर ब्रिगेडच्या गाड्या हजर झाल्या. अग्नीशमन आणि स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र अागीने विषण रुप धारण केल्याने आग विझवणे शक्य झाले नाही. अग्नीशमन विभागाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
सदर आगीमध्ये कोणतीही जीवित हानी नाही वित्तहानी व लाकडी फर्निचरचे नुकसान झाले आहे. यामध्ये साधारणपणे एकूण १५ ते २० लहान-मोठे लाकडी फर्निचर दुकाने आहे. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच आगीचे लोळ आणि धूर मोठ्या प्रमाणात निघत असल्याने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. वाहतूक कोंडी सोवण्यासाठी घटनास्थळी तांबे पोलीस अधिकारी व अंमलदार,आरसीपी अंमलदार व वाहतूक शाखेचे अंमलदार यांनी वाहतूक कोंडी सोवण्ली.


सदर आगीचे ठिकाणे दोन्ही बाजूस इलेक्ट्रिक ट्रांसफार्मर असून इलेक्ट्रिक वायर ह्या दुकानावरून गेलेले आहेत. तसेच रमजान महिना चालू असल्याने काही लोकांनी इलेक्ट्रिक ट्रांसफार्मरजवळ आग लागल्याचे सांगितले. सदरची आग विझविण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या ट्रांसफार्मर पासून आग लागली. सध्या घटनास्थळी विविध विभागाचे अधिकारी असून आग कशामुळे लागली, याचा कारण अद्याप स्पष्ट झाले नाही त्यामुळे पुढील चौकशी सुरू आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *